Emergency Call : 020 40151540

News Details

Diabetes Support Group 20th Nov 2015 Meeting 1
Friday November 20, 2015
डायबेटीस सपोर्ट ग्रुप : २० नोव्हें.१५ ( मीटिंग १ )
 
डॉ. वैशाली देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली स्थापन झालेल्या "डायबेटीस सपोर्ट" ग्रुपची पहिली मिटिंग दि. २० नोव्हें.१५ रोजी एण्डोक्रायनोलॉजी विभागामध्ये घेण्यात आली. जमलेल्या सर्वांचा परिचय घेऊन मीटिंग ची सुरवात करण्यात आली. सर्व वयोगटातील १२ मधुमेही रुग्णांनी या वेळी हजेरी लावली. त्यामध्ये सौ. सरदेसाई या त्यांच्या पतीला मधुमेह असल्याने काळजी कशी घ्यावी यासाठी तर श्री. सुदर्शन हे त्यांच्या ८ वर्षाच्या मुलीला टाईप १ मधुमेह असल्याने आले होते व त्यांनी त्याविषयी काहीही उपक्रम असल्यास राबविण्यास इच्छुक असल्याचे सांगितले.
 
यावेळी ग्रुप स्थापन करण्याचा उद्देश आणि त्या अंतर्गत घेण्यात येणार्‍या विविध उपक्रमांची माहिती देण्यात आली. ग्रुपच्या माध्यमातून आपण कशाप्रकारे समाजसेवा सुद्धा कशाप्रकारे करू शकतो हे त्या निमित्ताने रुग्णांना माहित झाले. एकूणच आलेल्यांपैकी सार्वजण स्वयंसेवक म्हणून काम करण्यासाठी तसेच ग्रुप पुढे सुरु ठेवण्यासाठी उत्सुक दिसले. 
 
यावेळी ग्रुप स्थापन करण्याचा उद्देश आणि त्या अंतर्गत घेण्यात येणार्या विविध उपक्रमांची माहिती देण्यात आली. ग्रुपच्या माध्यमातून आपण कशाप्रकारे समाज सेवा सुधा कशाप्रकारे करू शकतो हे त्या निमित्ताने रुग्णांना माहित झाले. एकूणच आलेल्यांपैकी सार्वजन स्वयंसेवक म्हणून काम करण्यासाठी तसेच ग्रुप पुढे सुरु ठेवण्यासाठी उत्सुक दिसले. 
 
पुढील मीटिंगची वेळ आणि तारीख ४ डिसें. निश्चित करून मिटिंगचा समारोप करण्यात आला. 
 
उपस्थिती : 
 
१. सौ. गीता दाभोळकर २. श्री. बी. ए. मोरे ३.श्री. सुरेश काळे ४.श्री. कदम (लोणी) ५. सौ. सुरेखा दांडेकर ६.विद्या आगाशे ७. श्री. मंदार ओंक ८. श्री. रवींद्र धायगुडे ९. श्री. विठ्ठल शिंदे १०.श्री. आबा आटोळे ११. सौ. जयश्री सरदेसाई १२. श्री. सुदर्शन 
 
नाव नोंदणीसाठी संपर्क : एण्डोक्राइन ओ.पी.डी. ( स.१०.०० ते दु. ४.०० सोम. ते शनि.) 
 
१. सौ.सविता विघे ( सहाय्यक डॉक्टर ) : ०२०- ४०१५१६६८ 
 
२. सौ.चिन्मयी भिसे ( कोऑर्डीनेटर एण्डोक्रायनोलॉजी ) : ०२०- ४९१५३०५५ 
 
३. सौ.आरती मोरे ( परिचारिका ) : ०२०-४९१५३०५२/३०४४ 
 
४. सौ. सीमा देशमुख : ०२०-४९१५३०५२/३०४४ 
« Back