Emergency Call : 020 40151540

News Details

डायबेटीस सपोर्ट ग्रुप : ८ जाने. २०१६ ( मीटिंग ४ )
Friday January 08, 2016
"डायबेटीस सपोर्ट" ग्रुपच्या चवथ्या मिटिंगमध्ये ठरल्याप्रमाणे २ मजल्यावरील कॉन्फरन्स हॉलमध्ये "आहार" या विषयावर माहितीसत्र घेण्यात आले. "लिली" या औषध कंपनीच्या प्रतिनिधी सौ. शर्वरी यांनी मधुमेही रुग्णांचा आहार कसा असावा व त्याचे दिवसभराचे नियोजन कसे करावे हे slides च्या मदतीने अतिशय उत्तम पद्धतीने समजाविले. आहार हा सगळ्यांचाच आवडीचा आणि पालन करण्यास तितकाच अवघड विषय असल्याने रुग्णसुद्धा भरभरून बोलत होते व शंका विचारात होते. या निमित्ताने carbohyadrtes, proteins, vitamins, minaralsयांचे नेमके प्रमाण व त्यांचे स्त्रोत काय आहेत तसेच रोजच्या क्यालरीज कश्या नियंत्रित कराव्यात हे सगळ्यांना माहित झाले. 
 
सत्राच्या शेवटच्या भागात डॉ. वैशाली देशमुख यांनी मधुमेही रुग्णांनी दिवसभरात किमान ४ वेळा खाणे का गरजेचे आहे आणि आहारामध्ये व्यक्तीसापेक्ष कसा आणि का बदल करावा हे सविस्तर सांगितले. 
 
"डायबेटीस सपोर्ट" ग्रुप सुरु ठेवण्याबाबत त्यांनी रुग्णांचा कल काय आहे हे पाहिले तर सगळ्यांनी एकमताने सहमती दर्शविली. 
 
श्री. सुरेश काळे यांनी रुग्णांच्या वतीने एण्डोक्राइन विभागाचे आभार मानले.
 
पुढील मीटिंग ठरल्याप्रमाणे फेब्रु. महिन्यातील दुसरा शुक्र. दि. १२ रोजी होईल असे जाहीर करून व उपस्थितांचे आभार मानून सत्राचा समारोप करण्यात आला . 
 
रुग्णांच्या सुचना : 
 
१. ग्रुप मिटिंगचे निवेदन वर्तमानपत्रामध्ये दिले तर जास्त लोकांपर्येंत आपण पोहचू शकू.
 
२. माई मंगेशकर मध्ये जर ग्रुप मिटींगची नोटीस लावता आली तर जास्त रुग्णांना याचा लाभ घेता येईल.
 
३. नेहमीच्या ओ.पी डी. मध्ये जर आमच्या पैकी कुणी येउन ग्रुपविषयी माहिती देऊ शकतो का जेणे करून नवीन लोकांना सदस्य करता येऊ शकेल. 
 
« Back