Emergency Call : 020 40151540

News Details

डायबेटीस सपोर्ट ग्रुप : १२ फेब्रु. २०१६ ( मीटिंग ५ )
Friday February 12, 2016

मागील मिटिंग मध्ये सुचित करण्यात आलेल्या बाबींचा आढावा घेऊन मीटिंगची सुरवात करण्यात आली. माई मंगेशकर रुग्णालयामध्ये आणि वर्तमान पत्रामध्ये निवेदन द्यावे अशी रुग्णांची सुचना होती त्याची अंमलबजावणी करण्यात आली. सकाळ वर्तमान पत्रामध्ये मीटिंग चे निवेदन आले आहे हे रुग्णांनी सांगितले.

गेल्या ४ मिटींग्ज मध्ये आपण मधुमेह या विषयावर बरेच ज्ञान मिळविले व गैरसमज दूर झाले असे त्यांनी सांगितले. मधुमेहावर ठिकठीकाणी कॅम्पस् होत असतात पण ते सर्व जाहिरात या उद्देशाने आयोजित केले असतात त्यामुळे इथे जे सायण्टीफ़िक नॉलेज मिळते ते तिथे आजपरेंत मिळाले नाही अशी काहींनी प्रतिक्रिया दिली. तसेच मागणीनुसार व्यायाम या विषयावर या मिटींगमध्ये माहिती चर्चासत्र आयोजित केले गेले.

डॉ.ऐश्वर्या ( फ़िजिओथेरपिस्ट) यांनी "व्यायाम" या विषयावर रुग्णांशी संवाद साधला व mild , moderate and high exercise यातील फरक सांगून वायोगटानुसार व ताकदीनुसार कोणाला कोणता प्रकार योग्य आहे ते वेगवेगळी उदाहरणे देऊन सांगितले.

समोर ध्येय ठेऊन व्यायाम केला तर कंटाळा येणार नाही असे त्या म्हणाल्या. गाणी ऐकत किंवा टी.व्ही. पाहताना अथवा आवडत्या व्यक्तीबरोबर जर व्यायाम केला तर त्यामध्ये नियमितता राहील असे त्या म्हणाल्या. व्यायामामुळे शरीरातील प्रत्येक पेशीला उर्जा मिळते व त्यांचे कार्य सुधारते पर्यायाने वजन कमी होते, HbA1C, BP, BSL , रक्तातील चरबी या सर्व गोष्टी नियंत्रित राहतात. हातापायाला मुंग्या येणे, जळजळ होणे ह्या मधुमेहाशी निगडीत तक्रारी, सांधेदुखी हळूहळू कमी होतात. व्यायामामुळे असे अनेक फायदे होतातच पण औषधांची संख्यासुद्धा कमी होते व क्वालिटी ऑफ लाइफ़ सुधारते आणि आत्मविश्वास वाढतो.
चालणे, पाळणे, सायकलिंग, पायर्‍या चढणे, पोहणे, पाण्यातील व्यायाम यातील झेपतील तेवढे व्यायाम करणे व हळूहळू फ्रिक्वेन्सी वाढवणे हे आवश्यक आहे या व्यतिरिक्त प्रत्येक खाण्यानंतर १० ते १५ मि. चालणे गरजेचे आहे असे त्यांनी नमूद केले.
व्यायामाच्या आधी आणि नंतर २० ते २५ मि. साखर तपासली तर फरक काय पडतो याचा अंदाज येतो असे त्या म्हणाल्या.

सत्राच्या शेवटी रुग्णांच्या शंकांचे निरसन करून डॉ.ऐश्वर्या यांनी त्याना काही सोप्या व्यायाम प्रकारांचे प्रात्यक्षिक दाखविले.
डॉ.ऐश्वर्या आणि सर्व रुग्णांचे आभार मानून व पुढील मिटींगची तारीख घोषित करून मिटिंगचा समारोप झाला

« Back