Emergency Call : 020 40151540

BILD CLINIC

मधुमेह, उच्चरक्तदाब, बिघडलेले कोलेस्टेरॉल, शारीरिक तंदुरुस्तीचा (फिजिकल फिटनेस) अभाव यासाठी एक अभिनव व्यायाम उपचार केंद्र

पुण्यातील अत्याधुनिक रुग्णालयामध्ये ४००० चौ. फूट जागेमध्ये जागतिक दर्जाच्या अभिनव उपकरणांनी सज्ज असे शास्त्रीय व्यायाम पद्धतीला वाहिलेले पहिलेच व्यायाम उपचार केंद्र.

_______________________________________________

लाखो वर्षांपांसून मानवजातीची उत्क्रांती वेगवेगळ्या टप्प्यातून झालेली दिसते. जीवनशैलीत होत गेलेल्या बदलांचा मानवाच्या आरोग्यावर मोठा परिणाम दिसून येतो. मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयविकार कोलेस्टेरॉल, पुन्हा पुन्हा डोके वर काढणारी कंबरदुखी, मानदुखी, स्नायूंची दुर्बलता असे अनेक विकार आजकाल सर्रास लहान वयात होताना दिसतात.

बदलत्या जीवनशैलीतून निर्माण होणारे आजार बरे होण्याकरिता वैद्यकशास्त्र प्रयत्नशील आहेच पणअशाप्रकारच्या आजारांवरील उपचारात सिंहाचा वाटा असतो तो म्हणजे शारीरिक तंदुरुस्ती अर्थात फिजिकल फिटनेसचा.उदाहरणार्थ मधुमेहासाठी फक्त गोळ्या घेण्यापेक्षा सोबत स्नायूबळ वाढवले तर ​इन्सुलिनची कार्यशक्ती ​वाढ ते मधुमेहावर नैसर्गिकरित्या नियंत्रण राहण्यास मदत होते. फिजिकल फिटनेस वाढवायचा असेल तर व्यायामाला पर्याय नाही. केवळ चालणे हे नुसते बसून राहण्यापेक्षा उत्तम, पण संपूर्ण शारीरिक तंदुरुस्तीसाठी इतर अनेक गोष्टी करता येत असतील तर फक्त चालणे हा एकच व्यायाम प्रकार पुरेसा नाही.

आमच्या संशोधनातून असे दिसून आले आहे की चयापचयातील (मेटॅबोलिझम) समतोल आणि शरीरक्रियेतील सुधार केवळ कॅलरीज खर्च करून साध्य होत नाही. वेगवेगळ्या प्रकारचे व्यायाम करणे त्यासाठी खूपच महत्वाचे आहे. मधुमेह असणाऱ्या व्यक्तींमध्ये शारीरिक तंदुरुस्तीचा अभाव आढळतो.यांत्रिक पद्धतीने कंटाळवाणी हालचाल करण्यापेक्षा मन (मेंदू) आणि शरीर यांचा

एकत्रित संवाद साधून केलेले व्यायाम हे जास्त उपयोगी आणि उत्साहवर्धक आहेत.

इंटरनेट, व्हाट्स अँप च्या माध्यमातून फिटनेस, व्यायाम याबद्दल बरीच उलट सुलट माहिती उपलब्ध होत असते, शेजारी,पाजारी, मित्र, नातेवाईक व्यायामाबद्दल असंख्य सल्ले देत असतात पण अर्धवट किंवा अशास्त्रीय माहितीच्या आधाराने चुकीचे व्यायाम करणे म्हणजे नव्या दुखण्याला आमंत्रणच. त्यातच व्यक्ती तितक्या प्रकृती त्यामुळे सर्वांना समान व्यायाम प्रकार एकाच प्रमाणात लागू होतीलच असे नाही. अशा अनेक महत्वाच्या मुद्द्यांना लक्षात घेऊन दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने ’बिल्ड क्लिनिक’ हे शास्त्रीय संकल्पनेवर आधारीत उपचार केंद्र सुरु आहे.

बिल्ड क्लिनिक व्यायाम उपचार केंद्राची वैशिष्ट्ये

  • व्यायाम कार्यक्रमाला सुरूवात करण्याआधी प्रत्येक व्यक्तीच्या शारीरिक क्षमता व तंदुरुस्तीचे (फिजिकल फिटनेसचे) मूल्यमापन, त्याबद्दलचे विश्लेषण आणि मार्गदर्शन.
  • प्रत्येक माणसाच्या गरजेप्रमाणे तयार केलेला विशिष्ट व्यायाम कार्यक्रम.
  • प्रशिक्षित मार्गदर्शकाच्या देखरेखीखाली केले जाणारे व्यायाम प्रकार.
  • मधुमेह, वाढलेले कोलेस्टेरॉल, उच्च रक्तदाब, तसेच शारीरिक तंदुरुस्तीचा अभाव असणाऱ्यांसाठी शरीरक्रियाविषयातील तज्ञ डॉक्टरांचे वैद्यकीय निरीक्षणाद्वारे सतत मार्गदर्शन.
  • मधुमेहींसाठी हायपोग्लायसेमिया (रक्तातील साखर कमी होणे) तसेच इतर दुष्परिणामांविषयी नियमित प्रबोधन तसेच रक्तातील साखरेच्या पातळीसंदर्भात विश्लेषण व मार्गदर्शन.
  • उच्च रक्तदाब असणाऱ्या रुग्णांच्या रक्तदाबाची नियमित नोंद
  • ताण तणाव कमी करण्यास उपयुक्त असे रंजक खेळ प्रकार.
  • आरोग्यदायी श्वसन प्रकारचे प्रशिक्षण


Click here for BILD HRPF Data

**********************************************

नवीन अभ्यास- मधुमेह टाळण्यासाठी शारीरिक तंदुरुस्ती महत्वाची !

वाचण्यासाठी क्लिक करा- http://bit.ly/3s5xUoq

हा अभ्यास निबंध श्री. अनिल नेने आणि सौ अश्विनी नेने यांच्या सढळ मदतीमुळे शक्य झाला. बिल्ड व्यायाम उपचार केंद्र नेने दांपत्याचे खूप आभारी आहे.

**********************************************

​नावनोंदणी आणि अधिक माहितीसाठी संपर्क :

०२०-४९१५४१०१ (वेळ सकाळी ७. ३० ते रात्री ८. ३० पर्यंत )

www.dmhospital.org या संकेत स्थळावर बिल्ड क्लिनिक बद्दल अधिक माहिती मिळेल

उपचार केंद्र प्रत्यक्ष पाहण्यासाठी ​ एकदा अवश्य भेट दया

पत्ता:

बिल्ड क्लिनिक
११ वा मजला, सुपर स्पेशियालिटी बिल्डिंग, दीनानाथ मंगेशकर रुग्णालय
म्हात्रे पुलाजवळ, एरंडवणे, पुणे - ४११००४
महाराष्ट्

मधुमेह उपाचार केन्द्राची झलक