Emergency Call : 020 40151540

News Details

जागतिक मधुमेह दिनानिमित्त "मधुमेह" या विषयावरील माहिती चर्चासत्र
Sunday November 08, 2015
डॉ. वैशाली देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली ८ नोव्हें २०१५ रोजी जागतिक मधुमेह दिनानिमित्त "मधुमेह" या विषयावरील माहिती चर्चासत्र दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात घेण्यात आले. डॉ. वैशाली देशमुख यांनी सर्व उपस्थितांचे स्वागत केले व एण्डोक्रायनोलॉजी विभागाची माहिती सांगून कार्येक्रमाची सुरवात केली.
 
यावेळी डॉ. वर्षा जगताप (एण्डोक्रायनोलॉजिस्ट), डॉ. अरुंधती खरे (पिडीयाट्रीक एण्डोक्रायनोलॉजिस्ट)
 
डॉ. मंजिरी दिक्षित ( मानसोपचारतज्ञ ), डॉ.अंजली केळकर ( आहार तज्ञ) ,डॉ. शर्मिला परळीकर (फ़िजिओथेरपिस्ट) या तज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाचा लाभ रुग्णांना झाला .
 
डॉ. वर्षा जगताप यांनी मधुमेहाची लक्षणे याविषयी महिती देताना आहार नियंत्रण, व्यायाम, औषध योजना, ज्ञानार्जन हे मधुमेहाचे आधारस्तंभ कसे आहेत ते सांगितले व मधुमेहाची लक्षणे कशी ओळखावित हे सांगितले. 
 
डोळे, हृदय, मेंदू, किड्णी या अवयवांवर "मधुमेहामुळे होणारे दुष्परिणाम" टाळता यावेत म्हणून काय काळजी घ्यावी याविषयी डॉ. वैशाली देशमुख यांनी रुग्णांना मार्गदर्शन केले.
 
डॉ. अरुंधती खरे यांनी "लहान मुलांमधील मधुमेह " हा मोठ्यांपेक्षा कसा वेगळा आहे आणि त्याची काळजी कशी घ्यावी व मुलाना इन्सुलिन आणि रक्त शर्करा तपासणीसाठी कसे तयार करावे याबद्दल माहिती केले. 
 
डॉ. मंजिरी दीक्षित यांनी " मधुमेही रुग्णांची मानसिकता " याविषयी उत्तम मार्गदर्शन केले व त्यांच्या शंकांचे निरसन केले.
 
डॉ. अंजली केळकर यांनी " मधुमेह आणि आहार " तसेच डॉ. परळीकर यांनी " मधुमेहींनी करावयाचे व्यायाम " या जिव्ह्वाळ्याच्या व अवघड विषयांवर रुग्णांशी संवाद साधला, रुग्णांनीसुद्धा उत्तम प्रतिसाद दिला. 
 
बर्‍याच वर्षांपासून मधुमेहाशी यशस्वीपणे झुंज देत असलेल्या काही रुग्ण प्रतिनिधींनासुद्धा अनुभव कथनाची संधी या निमित्ताने देण्यात आली. १५ वर्ष वयाची पायल, इन्सुलिन बंद झालेले श्री. पुसाळकर, गरोदर असलेल्या मधुमेही सौ. खानापुरे अशांचे अनुभव उपस्थित रुग्णांना प्रेरणादायी ठरले. 
 
गेली २० वर्षे मधुमेहाचा मित्राप्रमाणे सांभाळ करणारे श्री. देशमुख काका यांनी छोटे छोटे गमतीदार किस्से व कथा सांगून सर्वांचे मनोरंजन केले. मधुमेहींना सुद्धा कसे चिरतरुण राहता येते याचे उत्तम उदाहरण ते ठरले. 
 
या कार्येक्रमाचे औचित्य साधून डॉ.वैशाली देशमुख यांनी "Diabetes Support Group " आणि "Thyroid Support Group " ची अनाउन्समेण्ट केली.
 
कार्येक्रमाचे प्रेरणास्थान व रुग्णमित्र असलेल्या कै. कोंडेजकरकाका यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. रुग्णालयाचे संचालक डॉ.धनंजय केळकर, आजच्या कार्येक्रमाचे प्रायोजक तसेच सर्व उपस्थितांचे आभार मानून डॉ.वैशाली देशमुख यांनी कार्येक्रमाची सांगता केली. 
 
एकूण ९४ रुग्णांनी या माहिती चर्चासत्राचा लाभ घेतला.
 
 
रुग्णांचे अभिप्राय : 
 
१. दिवाळीची मेजवानी मिळाली.
 
२. असे कार्येक्रम वारंवार आयोजित करावेत .
 
३. तज्ञ डॉक्टरांशी संवाद साधता आला. 
 
४. अतिशय उपयुक्त व मार्गदर्शक माहिती मिळाली.
 
५. पुढील कार्येक्रमाला बोलावा .
 
६. रुग्णांचे अनुभव कथन आवडले व प्रेरणादायी होते.
 
असे अनेक उत्तम अभिप्राय रुग्णांनी नोंदविले आहेत. 
 
« Back